जनतेज न्युज

विद्या चव्हाण यांची सरकार वर जोरदार टीका

प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : नागरिकांना ढोंगी हिंदुत्वाचा अनेस्थेशिया देण्यात येत आहे. हनुमान चालीसा वाचून आणि भोंगे वाजवून महागाई कमी होणार नाही. हे प्रश्नच नाही. फक्त महागाई आणि बेरोजगारी हे दोनच प्रश्न आहेत. आम्ही तुम्हाला आमदार किंवा खासदार म्हणून निवडून दिले ते केवळ आमचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी सिलिंडर, पेट्रोल, सीएनजी महाग झाले आहे, मुख्यमंत्री स्वतः रिक्षाचालक होते. मात्र आता सध्या रिक्षाचालक आणि टॅक्सी चालक पीएनजी महागल्यामुळे व्याकुळ झाले आहेत. व सामान्य गोरगरिबांना तुम्ही मदत करणे आवश्यक आहे. धर्मावर न बोलता महागाई आणि बेरोजगारीवर बोला एवढीच आमची मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले. बेरोजगार तरुणांना डिग्री असून नोकऱ्या नाही त्या कधी मिळणार महागाई कधी कमी होणार असा प्रश्न आमच्या महिलावर्ग विचारत आहेत. गुजरातची आणि दिल्लीची मुजरेगिरी करत आहात. की मुजरेगिरी बंद करून आम्हाला काहीतरी दिलासा द्यावा यासाठी आम्ही निवडून दिले आहे. तो दिलासा तुम्ही नागरिकांना  देऊ शकत नाही. तुम्ही कॅपेबल नाही असा अरोप विद्या चव्हाण यांनी भजपवर केला आहे. शेतकऱ्याला  40 पैसे किलो टोमॅटो विकावे लागले हेच टोमॅटो शहरात  70 रुपये ते 80 रुपये किलोने विकले जातात. भिकाऱ्याला सुद्धा 40 पैसे दिले तर तो त तुमच्या तोंडावर फेकेल. साडेदहा लाख कोटीचे  मोठमोठ्या भांडवलदारांचे कर्ज माफ केले. मग आमचं काय? शेतकऱ्याला का नाही देत कर्ज माफी.