जनतेज न्युज

विद्याविहार येथे दुर्घटना झालेली इमारत पाडण्याच्या कामाला सुरुवात

प्रतिनिधी, मुंबई : विद्याविहार येथील दुर्घटना झालेली इमारत आता जमीन दोस्त करण्यासाठी पाडण्याचं काम सुरू झालेलं आहे. दोन व्यक्तींना या इमारतीच्या खालून काढण्याचं काम आहे ते आता होत आहे, त्यासाठी ही इमारत पाडण्यात येत आहे. मोठे प्रयत्न करत ही इमारत पाडण्यात येत आहे, कारण आजूबाजूच्या इमारतीला धक्का लागू नये त्यासाठी मोठ्या यंत्रणाच्या साहाय्याने हे काम करण्यात येत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.