प्रतिनिधी, नांदेड : देशात होत असलेल्या हिंदूच्या हत्या, हल्ले याचा निषेधार्थ आज नांदेड मध्ये मुक मोर्चा काढण्यात आला. विश्व हिंदू परिषद आणि हिंदूत्ववादी संघटनांनी या मुळ मोर्चाचे आयोजन केले होते… शहरातील जुना सराफा मधून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना भेट देऊन विविध राज्यात हिंदूच्या हत्या, हल्ले करणाऱ्यांना कडक शासन करण्याची मागणीचे निवेदन दिले. या मुक मोर्चात हिंदूवरील हल्ल्याचा निषेध करणारे फलक तसेच हातात झेंडे घेऊन मोठ्यासंख्येने हिंदु बांधव मुक मोर्चात सामिल झाले होते.
