जनतेज न्युज

विठेवरी साकारला अवघ्या २ तासात विठ्ठल

प्रतिनिधी , सोलापूर : आज आषाढी एकादशीनिमित्त लाखो वैष्णवांचा मेळा पंढरपूरा त भरला आहे.प्रत्येकाला विठ्ठल दर्शनाची आस लागलेली आहे. कांहीशी अशाच पद्धतीची विठूभक्ती सोलापुरातील चित्रकार विपुल मिरजकरने दाखवली आहे.विपुलने अवघ्या २ तासांत विविध रंगांचा वापर करत चक्क विठेवरतीच विठ्ठलाची प्रतिमा साकारली आहे.विपुलने साकारलेली विठ्ठलाची प्रतिमा अतिशय मनमोहक असून अनेकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे.