जनतेज न्युज

अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न ने सन्मानित करावे अशी मागणी दलित महासंघाने जिल्हाधिकार्यालय समोर केली.

औरंगाबाद: दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रमुख मागण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.
स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर मातंग समाज आजही मागासलेल्या अवस्थेत जीवन जगत आहे संविधानाने दिलेल्या हक्कापासून तो समाज वंचित आहे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय अशा सर्वच क्षेत्रात मातंग समाजाला अपेक्षा होत आहे.त्यांना नोकरी मध्ये डावलले जात ते मातंग विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मध्ये डावलले जाते परिणामी मातंग समाजापासून प्रगती होणे अवघड झाले आहे मातंग समाजासाठी स्थापन झालेले अण्णाभाऊ साठे महामंडळ गेली सहा वर्ष निष्क्रिय आहे त्या महामंडळात निधी उपलब्ध नसल्यामुळे मातंग समाजाला उद्योग व्यवसायाची संधी नाकारली जात आहे. तसेच मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये करण्यात यावे
अण्णाभाऊ साठे महामंडळाला हजार कोटी भांडवल द्यावे
तसेच अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्नाने सन्मानित करावी अशी मागणी दलित महासंघाने केली आहे