प्रतिनिधी , भंडारा : एंकर-रंग उडालेले शासकीय ओसाड बंगले, वाळलेली झाडे ,अंगणभर पालापाचोळा असे काही से चित्र आपल्याला शासकीय बंगल्यात पहायला मिळत असतात,मात्र याला भंडारा जिल्हा पोलिस मुख्यालयातील एक निवासस्थान अपवाद असल्याचे पहायला मिळत।800 च्या वर फुलझाड़े, सुंगधी, शोभवंत पानाफुलांची आरास,आकर्षक कुंडया अशा हा आकर्षक मनमोहक देखावा अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या शासकीय निवासस्थानी पहायला मिळत असून अनिकेत भारती यांच्या सौभ्याग्यवती निसर्गप्रेमी गीतांजली भारती यांची ही किमया करून दाखविली आहे।
शासकीय निवासस्थान म्हणजे अधिकारी कर्मचारी यांच्या साठी तातपुर्त निवारा असून एक दोन वर्षासाठी राहायला येणारा अधिकारी त्यात फारसा बदल करत नाही।मात्र याला अपवाद अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांच्या बंगला आहे।अनिकेत भारती जेव्हा या निवासस्थानी रहायला आले तेव्हा ह्याही बंगल्याचे रूप असेच होते।मात्र त्यांच्या निसर्ग प्रेमी पत्नी गीतांजली यांनी अवघ्या एका वर्षात या बंगल्याचे रुपच पालटत बंगल्याच्या मुख्य प्रवेश द्वारापासुन तर शेवटच्या कोपऱ्यान कोपरा पर्यत्न फुलझाड़े लावली।तब्बल 800 च्या वर वेगवेगळ्या प्रजातिच्या फुलझाड़े त्यांनी लावली असून निवासस्थान जणू नंदनवन भासु लागले आहे।आपन राहत असलेले घर शासकिय असो की स्वताचे त्यात जीव ओतला की घर आपल्याला ही भरभरून देते ह्या मताच्या गीतांजली भारती आहेत।धकाधकीच्या जीवनात अधीक्षक साहेबांचे मानसिक आरोग्य ही चांगले राहावे यासाठी खारिचा वाटा उचलत असल्याच्या उल्लेख त्यांनी यावेळी केला आहे।आपल्या दोन चिमुकल्यासोबत ह्या फूल झाडांचे रंगोपन करत असल्याने आता त्यांच्या कार्याची चर्चा जिल्हाभर होऊ लागली आहे।
