जनतेज न्युज

अनधिकृत बांधकामाच्या नावाखाली बिल्डरांकडून उकळले चक्क 8 कोटी…

चौघांवर खंडणीची गुन्हा दाखल…

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : डोंबिवलीत अनधिकृत बांधकामाच्या नावावर बिल्डरांकडून 8 कोटी उकळणाऱ्या 4 जणांविरोधात खंडणीची गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी बिल्डरांनी चौघांना त्वरित अटक करून आम्हाला न्याय द्या अशी मागणी केली आहे.
डोंबिवली पूर्वेतील नांदिवली परिसरात काही इमारतींचे काम सुरू आहे. या परिसरात काही वर्षांपासून बिल्डर वर्गीस म्हात्रे, विक्रांत सिंग आणि काही बिल्डर इमारतीचे बांधकाम करीत आहेत. या बिल्डरांना अनधिकृत बांधकामाच्या नावाखाली ब्लॅकमेल करून 8 कोटी रुपये उकळल्याचा आरोप विद्या म्हात्रे, विश्वनाथ म्हात्रे, एकनाथ म्हात्रे आणि सुनील म्हात्रे यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पत्रकार परिषद घेऊन बिल्डर वर्गीस म्हात्रे आणि विक्रांत सिंग यांनी सदर महिला आणि तिच्या नातेवाईकांनी वारंवार आम्हाला ब्लॅकमेल करून आत्तापर्यंत 8 कोटी रुपये घेतले आहेत.. त्यामध्ये काही फ्लॅटचा देखील समावेश आहे. हे पैसे चेक द्वारे दिले गेले आहेत. या महिलेला आणि त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी लवकरात लवकर अटक करून आम्हाला न्याय दिला पाहिजे. सदर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचे वैध करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे बिल्डरांकडून सांगण्यात आले अशी मागणी केली.याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी प्रकरणात या चौघां विरोधात जी तक्रार करण्यात आली आहे त्याचा सखोल तपास सुरू आहे. सादर आरोपींनी अटक पूर्व जमीनेसाठी न्यायालयात धाव घेतली आहे. तपास सुरू आहे कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगितले