कोरंभी येथील युवकाचे मृत्यू प्रकरण
पत्नीसह अन्य दोघांना अटक
प्रतिनिधी , भंडारा : भंडारा तालुक्यातील कोरंभी नदीपात्रात आढळुन आलेल्या युवकाच्या मृतदेहाची ओळख पटली असुन नंदकिशोर सुरजलाल रहांगडाले (३४) रा. नवाटोला ता. गोरेगाव जि. गोंदिया असे मृतकाचे नाव आहे. अनैतिक संबंधातुन त्याच्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा खुन केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलीसांनी आरोपी पत्नी योगेश्वरी नंदकिशोर रहांगडाले, तिचा प्रियकर सामेश्वर पुरनलाल पारधी व अन्य साथीदार लेखराम ग्यानीराम टेंभरे यांना ताब्यात घेत ले आहे.
तपासा दरम्यान मृतकच्या पत्नीचे मागील ४ वर्षापासून गावालगत राहणारा सामेश्वर पुरनलाल पारधी (३९) रा. पाथरी जि. गोंदिया याच्यासोबत अनैतिक संबंध होते. याची माहिती मृतकाला झाल्याने नंदकिशोर रहांगडाले याला ठार मारल्याचे कबुल केले.
Vo -४ डिसेंबर रोजी मृतक व त्याची पत्नी हे दोघेही मोटारसायकलने मौजा वलनी खापरखेडा येथून स्वगावी नवेगाव टोला येथे जाण्यासाठी निघाले. ते नागपूर मार्गे भंडारा, गोरेगाव असे जात असताना मौजा लाखनी सालेभाटा जवळ पत्नीने गाडी थांबविली. दरम्यान आरोपी सामेश्वर पुरनलाल पारधी रा. पाथरी जि. गोंदिया, लेखराम ग्यानीराम टेंभरे रा. मुंडीपार जि. गोंदिया हे दोघेही चार चाकी वाहनाने तिथे आले व अंधाराचा फासदा घेत नंदकिशोर याच्या डोक्यावर लोखंडी सळाखीने वार करून जिवानिशी ठार मारले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिन्ही आरोपींनी मृतकाचे प्रेत एका पोत्यामध्ये भरुन कारधा येथे वैनगंगा नदीच्या मोठ्या पुलावरून फेकून दिल्याचे त्यांनी पोलीसांना सांगीतले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि जयवंत चव्हाण, सपोनि लांबाडे, मट्टामी, गायकवाड, पवार, पोउपनि. उईके, गभने, पोहवा तुळशीदास मोहरकर, पोहवा नितीन महाजन, पोना विजय राउत, दिनेश आंबाडारे, ईश्वर कुथे, पोशि मंगेश माळोदे, मपोशि चौरे, कटौते व भंडारा पोस्टेचे पोनि सुधाकर चव्हाण, पोउपनि अरविंदकुमार जगने, सफौ. श्रीवास, पोना बुरडे, भोंगाडे यांनी केली.
