प्रतिनिधी , अमरावती: केंद्र सरकारने पारित केलेले कृषी विधेयक हे शेतकरी विरोधी असून हे काळे कायदे तात्काळ केंद्र सरकारने मागे घ्यावे यासाठी अमरावतीत राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेसन अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला होता या पोलिसांनी लावलेले बॅरिकेट तोडून जिल्हाधिकारी कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला होता यावेळी आंदोलन व पोलिसांन मध्ये शाब्दिक चकमक उडाली होती यात मोठ्या प्रमाणावर तणाव सदृश परिस्थिती निर्माण झाली होती,अमरावतीत निघालेल्या ट्रॅक्टर मोर्चाने शहर दणाणून गेले होते, यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना काँग्रेसने निवेदन देऊन केंद्र सरकारने लागू केलेले कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली तर या विधेयका वरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर टीका केली
