जनतेज न्युज

अमरावतीत वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने प्रवासी ताटकळत

प्रतिनिधी , अमरावती : अमरावतीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ३६ तासांची विकेंड लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे. या दरम्यान जिल्ह्यात पूर्ण वाहतूक व्यवस्था सुद्धा बंद करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या बसची वाहतूक बंद असल्याने याचा फटका आता बाहेरून आलेल्या प्रवाश्यांना बसतांना दिसत आहे. शहरात रेल्वेने आलेले प्रवासी आता आपल्या घरी जाण्याकरिता बस स्थानकासमोर सकाळपासून ताटकळत उभे आहे. सकाळपासून अमरावती बस स्थानकाबाहेर कुठे विद्यार्थी तर काही नागरिक वाहतूक व्यवस्थेची वाट पाहताना दिसत आहे.