जनतेज न्युज

अर्थसंकल्प बाबत सर्वसामान्य महिलांची प्रतिक्रिया…

प्रतिनिधी , : आज सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात महागाईचा वाढलेला उच्चांक आणि त्यामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती त्यावर केंद्र सरकारने तोडगा काढावा. गॅस आणि पेट्रोल डिझेल चे वाढलेले दर कमी करावेत, देशाचा घसरलेला जीडीपी वाढवून महागाई कमी करावी. महिलांसाठी उद्योगधंद्यांची निर्मिती करून आर्थिक हातभार लावण्यास मदत होईल, कोरोना कालखंड यामुळे तरुणांमध्ये निर्माण झालेला निरुत्साह कमी करून तरुणांसाठी रोजगार आणि उद्योगधंद्यांची निर्मिती करावी, अन्यथा नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच शेतकऱ्यांवर आलेल्या विविध आर्थिक संकटामुळे आत्महत्या करण्याची आलेली वेळ उद्या सर्वसामान्यांवर देखील येईल अशी प्रतिक्रिया धुळे शहरातील गृहिणी राजश्री वानखेडे यांनी व्यक्त केली.