प्रतिनिधी, अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील पाडाळने येथे शिवजयंती उत्सव संपन्न
आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव पूर्ण महाराष्ट्रात व देशात अतिशय उत्साहात साजरा करण्यात येतो याचाच एक भाग म्हणून आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील पाडळाने येथे शिवजयंती उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली यामध्ये भव्य शिवजयंती महोत्सव भूमिपुत्रांचा सेवापुर्ती गुणगौरव सोहळा संपन्न करण्यात आला.
यावेळी युवाशक्ती पाडाळने व ग्रामस्थांतर्फे गावच्या भूमिपुत्रांचा शिवजयंतीच्या औचित्य साधत यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अकोले तालुक्यातील पाडळीने ग्रामस्थ माऊली नवले व राजू तळेकर यांच्या विशेष प्रयत्नाने युवाशक्ती पाडळने तर्फे गावच्या भूमिपुत्रांचा सेवापुर्ती गुणगौरव सोहळा पार पडला यावेळी जय राम नवले ,बाळू सावंत ,राजू देढे , विजय सुपे ,संजय नवले दशरथ सावंत ,आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाराष्ट्रातील आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव पूर्ण राज्यात व देशात अतिशय धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो यावेळी पाडळीने अतिशय छोटे से गाव अकोले तालुक्यात संपूर्ण ग्रामस्थांतर्फे महिला , बाल यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती टाळ-मृदुंगाच्या गजरात व लेझीमच्या तालावर डीजे च्या तालावर ची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली महिला मंडळ व पालकांनी सहभाग घेत छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराजांची जयंती गावात मिरवणूक साजरी करण्यात आली यावेळी संपूर्ण ग्रामस्थ वर्ग उपस्थित होता यावेळी गावातील सेवापूर्ती झालेल्या भूमिपुत्रांचा गावाच्या तर्फे सत्कार करण्यात आला
