प्रतिनिधी , आज भाजपच्या ओबीसी कार्यकारिणीची बैठक पार पडली. या कार्यकारिणीला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला इशारा देतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मराठा समाजाला आरक्षण देताना आम्ही त्यात ओबीसींच्या आरक्षणाला धक्का दिला जाणार नाही, याबाबतचं कलम टाकलं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. पण या कलमाला कोणतीही स्थगिती दिली नाही. या कलमाद्वारे आम्ही ओबीसी आरक्षणाला संरक्षण दिलं आहे, असं सांगतानाच कोणत्याही परिस्थितीत आम्ही ओबीसी आरक्षणात वाटेकरी स्वीकारणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा, रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप ओबीसी नेत्यांच्या कार्यकारिणीत बैठकीत दिला.
