जनतेज न्युज

आजच्या आधुनिक युगात देखील आराम करण्यासाठी खाटेची मागणी यातून मिळतो चांगला रोजगार

प्रतिनिधी, नंदुरबार : आजच्या आधुनिक युगात जुन्या वस्तुंना फाटा देत नवनवीन वस्तू बाजारात दाखल होत आहे . आराम करण्यासाठी पलंग ,कॉट ,आरामदायी खुची नवनवीन डिझाइन मध्ये आपणास बाजारात दिसतील .परंतु आजच्या युगात देखील जुन्या काळातील आराम करण्यासाठी वापरात येणारे खाट ची क्रेझ कमी झाली असे दिसत नाही . ग्रामीण भागा सह शहरी भागात देखील खाटी ला तेवढीच मागणी आहे जी पहिले होती .आज देखील प्रत्येक घरात आपणास आराम करण्यासाठी तसेच जोपण्यासाठी लागणारी खाट दिसून येतील .या खाट गुफणे हे देखील एक कौशल्याचे काम आहे यातून अनेक लोकांना रोजगार मिळत असल्याचे दिसून येथे .चुनीलाल पाडवी हे दिवसातून 4 किंवा 5 खाटी गुफतात यातून त्यांना मोठा प्रमाणात रोजगार मिळत असल्याचे दिसून येत आहे .एक खाट बनवण्याचे त्यांना 200 रु मिळतात दिवस भरात 4 ते 5 खाट बनवून तयार करतो .
एक खाट बनवण्यासाठी साधारणपणे तीन ते साडेतीन किलो सुती किंवा नायलॉन ची दोरी लागत असते. हे बनवण्यासाठी एक ते दीड तासाचा अवधी लागतो. हा व्यवसाय मी 16 वर्षा पासून करत असून सुरुवात केली तेव्हा 40 रु प्रत्येक खाट बनवण्यासाठी मिळत होते परंतु आज 200 रु मिळतात . ज्यांना खाट गुफण्याची आहे ते थेट माझ्याशी संपर्क करतात व मी घरी जाऊन खाट गुंफून देत असतो . यातून मला चांगल्या रोजगार मिळत आहे असे चुनीलाल पाडवी यांनी सांगितले.आजच्या आधुनिक युगात कितीही नवीन वस्तू आल्यात तरीही जुन्या काळातील आराम करण्यासाठी वापरात येणारे खाट ला आजही तेवढीच मागणी असल्याचे दिसून येते .