जनतेज न्युज

आता जबाबदारी प्रणितींकडेच – सुशीलकुमार शिंदे

प्रतिनिधी, सोलापूर : आता या पुढे शहर जिल्ह्यातील पक्षाची धुरा ही प्रणितींकडेच असेल त्या सक्षमपणे जबाबदारी पार पाडतील असा विश्वास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील पक्षाची धुरा यापुढे प्रणिती शिंदे यांच्याकडे असेल असं स्पष्ट करताना ही जबाबदारी त्या सक्षम पणे सांभाळतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान,राज्यसभा निवडणूक ही अविरोध करण्याची परंपरा आहे. मात्र,भाजपाने अधिकचा उमेदवार देऊन ही निवडणूक लादली असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत.
तर आखाती देशात भाजप नेत्यांच्या वक्तव्यामुळे संताप उसळला आहे ही बाब गंभीर आहे.
बेतालपणे वागणं हेच यातून दिसून येतं आता याचे परिणाम देशाला भोगावे लागत आहेत असं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.