प्रतिनिधी , कोल्हापूर: यापूर्वी आपण सर्वात तरुण उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेलं आपण पाहिले आहे. पण आत्ता राज्यात होवू घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने 75 वर्षीय आजी निवडणूक रिंगणात उतरली आहे..त्या आजीचे नाव हौशाबाई दुंडाप्पा कांबळे असून ही आजी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील गिजवणे गावची.
राज्यात जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोठ्या इर्षेन उमेदवारी अर्ज भरले जात आहेत.. कोल्हापुर जिल्ह्यात देखील हीच ईर्ष्या पाहायला मिळाली.. एकीकडे प्रत्येक उमेदवार मोठा गाजावाजा करत अर्ज दाखल करण्यासाठी येत होते, त्याच वेळी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरातील श्रेष्टी विद्यालयावर अर्ज करण्यासाठी गीजवणे गावची 75 वर्षीय हौशाबाई कांबळे पोहचली. गिजवणे गावातील हौशाबाई कांबळे या देवदाशी असून गृहिणी आहेत त्याना एक मुलगा आणि एक मुलगी आणि नातवंडे आहेत. स्वता यल्लामा देवीची भक्त आणि देवदाशी असल्याने त्या गावात जोगवा मागतात. या निमित्ताने त्याचा गावात चांगला जनसपर्क आहे. त्याचाच विचार करून त्यानी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मुलाने निवडणूक लढविण्यासाठी सहमती दर्शविल्यानंतर त्या थेट उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लगबगीने पोहचल्या.. यावेळी त्यांनी लोकांची काम करायला निवडून यायचं असल्याची इच्छा बोलावून दाखवली.
5 वर्षीय हौशाबाई कांबळे यांनी या वयात आपन नक्की निवडून येणार आणि गावची विकासाची कामे करणार असल्याचं सांगितले. यावरुन 75 वर्षीय हौशाबाई आजींची या वयात निवडून येण्याची दाखवलेली सक्रियता आणि आजीची ऊर्जा तरुण पिढीला प्रेरणादायी आहे.
