जनतेज न्युज

आदित्य ठाकरे हे तरुण आहेत. नवीन मंत्री आहेत. त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत असं सांगतानाच किमान आदित्य ठाकरे यांनी तरी सौनिक समितीचा अहवाल वाचावा.

प्रतिनिधी , कांजूरमार्ग कारशेडबाबत या समितीने काय म्हटलं याचा अभ्यास करावा असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना दिला.
कांजूरमार्ग कारशेडप्रकरणी कोर्टाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा निर्णय दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना हा सल्ला दिला. आदित्य ठाकरे नवीन आहेत. नवे मंत्री आहेत. त्यांनी जनहितासाठी काम करावं. त्यांच्याच सरकारने सौनिक समिती स्थापन केली होती. या चार सदस्यांच्या समितीने अहवाल दिला आहे. त्याचा आदित्य यांनी अभ्यास करावा असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला. आदित्य ठाकरे यांनी कांजूरमार्गप्रकरणी उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे. त्याने काय फरक पडणार आहे? सत्य तर बदलता येणार नाही. त्यामुळे सत्य स्वीकारून राज्य सरकारने पुढे गेलं पाहिजे असंही ते म्हणाले.