प्रतिनिधी , कोल्हापूर : गेल्या पाच वर्षात कोल्हापूर महानगरपालिकेत गाजलेल्या विविध घोटाळ्यांचा जाब विचारण्यासाठी आज आम आदमी पार्टीच्या वतीन पंचनामा मोर्चा काढण्यात आला… कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर ला संपते या पार्श्वभूमीवर या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं.. दसरा चौकातून सुरु झालेला हा मोर्चा महानगरपालिकेवर धडकला… यावेळी अमृत योजना,घरफाळा घोटाळा बद्दल आंदोलकांनी निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली… या आंदोलकांनी महानगरपालिकेच्या दारात येत झालेल्या कामांचा हिशोब द्या अशी मागणी केली…. महानगरपालिका दरवर्षी आर्थिक ऑडिट तर करते मात्र झालेल्या कामाची चौकशी कोण करणार असा सवाल या आंदोलकांनी यावेळी केला… पाच वर्षात सत्ताधाऱ्यांनी फक्त ढपले पाडले.. इतकंच नाही तर असे शब्दप्रयोग सुद्धा नेत्यांनीच वापरून पदाधिकाऱ्यांना कुरण मोकळं करून दिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला… या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला आणि युवक सहभागी झाले होते…
