प्रतिनिधी, मुंबई : भारतीय जनता पक्षाचा आयटी सेल आणि गुवाहाटीला बसलेले अस्वस्थ आत्मे हे काहीही आणि कुठल्याही शब्दाचा अर्थ काढतील त्यांचा महाराष्ट्राची संपर्क तुटल्यामुळे मराठी भाषेशी पण संपर्क तुटलेला दिसतोय
कालचा दहिसर चे भाषण माझ्याकडे आत्ता ही आहे मी तुम्हाला ऐकवतो. इकडे गोहाटी मध्ये आहेत त्यांचा आत्मा मेला आहे त्यांची बॉडी त्यांचा आत्मा मेला हे जर मी बोललो असेल आणि ते खरं आहे तुम्ही समजून घेत नाहीत मी बाप काढला त्याच्यामध्ये मनाला लागणारेअसं काय आहे आत्ताच गुलाबराव पाटील यांचे भाषण ट्विट केला आहे. ते स्वतः बाप बदलण्याची भाषा बोलत आहे त्यांनी जे मार्गदर्शन केलेला आहे गोहाटी मध्ये बसले आहेत त्यांच्यासाठी मी हे गुलाबराव पाटील यांचे भाषण ट्विट केलं आहे.
बाप बदलण्याची भाषा ही गुलाबराव पाटलांचे आहे आमची नाही
जे लोक चाळीस वर्ष पार्टी मध्ये राहतात त्यांचा आत्मा मेला आहे
कोणाचीही भावना हेच पोचवण्याचा प्रयत्न केला नाही
दीपक केसरकर आमच्या जवळचे आहेत उद्या सामंत आमच्या जवळचे आहेत तिकडे जेवढे आहेत तेवढे सगळे आमच्या जवळचे आहेत एकनाथ शिंदे हे आमच्या सगळ्यात जवळचे आहेत
कायदेशीर लढाई आहे आणि स्टेट फाइट लढाई आणि कायद्याची लढाई शरद पवार यांनी सांगितला आहे तुमच्याकडे बहुमत आहे आमदारांचे बळ आहे तर थांबत आहे कशाला
50 आमदारांची ताकद आहे तर तुम्ही गुवाहाटीमध्ये का बसले आहात
ते हिमतीने लोक आहेत ते म्हणून ते हिंमत दाखवून आधी सुरतला गेले गुहाटी ला गेले. केंद्रीय सुरक्षा त्यांना संरक्षण देते मग भीती कसली आहे
महाराष्ट्राचे पोलीस संरक्षण करायला सक्षम आहे
तुम्हाला गुलामी पत्करून संरक्षण मिळवावे लागते याची गरज नाही वनवन फिरायची गरज नाही
तुम्ही अशा लोकांसोबत कसं काय संबंध ठेवू शकता ज्यांचे सम्बन्ध मेहबूबा मुक्ती यांच्यासोबत आहेत
ऑन उदय सामंत
प्रत्येकाची मर्जी प्रत्येकाची इच्छा यांच्याकडून अशा निष्ठेच्या अपेक्षा करायच्या एकनाथ शिंदे सारखे माणूस ज्यांनी आयुष्य काढला आमच्याबरोबर तर इतरांना कसा करतात दोष द्यायचा मला वाटतं काही लोकांना डांबून ठेवला आहे ते परत येतील
शेवटी ते सगळे आमचे लोक आहेत उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे या सगळ्यांनी त्यांना सांभाळले अडीच वर्षातील परिस्थिती आपण पाहिली असेल या सगळ्यांचा गैरफायदा घेऊन जर तुम्ही गेला असाल महाराष्ट्रालाही पटणार नाही
केंद्रीय संरक्षण यंत्रणा आणि ईडी तुम्हाला मतं मिळवून देणार नाही मतजनता देणार आहे
आम्ही मरू पण पार्टी सोडणार नाही
आम्ही त्यांना थांबवलं आहे का येऊ द्या चैतन्य महाराज साथिया व मोकळ्या हवेत श्वास घ्यावा
मी काल एक वृत्त ऐकलं की बंडखोर आमदारांना अमित शहा यांनी संवाद साधला
त्यामुळे आमदारांमध्ये नवचैतन्य उसळला ही फार इंटरेस्टिंग बातमी आहे
ते एम आय एम मध्ये देखील जाऊ शकतात समाजवादी पार्टी मध्ये देखील जाऊ शकतात
ज्या शिवसेनेने त्यांना जन्म दिला त्यामुळे शिवसेनेचा द्वेष करून एखाद्या पक्षात जात असतील तर महाराष्ट्राची माती त्यांना माफ करणार नाही
मनसेला अशा पद्धतीने जर मुख्यमंत्री पद मिळत असेल तर ही फार ऐतिहासिक गोष्ट होईल
कळेल लवकरच काय होत आहे ते भविष्यात अनेक गोष्टींचा उलगडा होईल
फ्लोर ऑफ हाऊसला जी परीक्षा होईल त्यात आम्ही उत्तीर्ण होऊ अशी मला खात्री आहे
