जनतेज न्युज

उकळत्या तेलात कॉईन काढणाऱ्या महिलेच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे पोलीस अधीक्षकांचे आदेश

प्रतिनिधी , उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा येथील महिलेचा उकळत्या तेलात हाथ घालून कॉईन काढण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या संदर्भात महिलेच्या विनंतीवरून सोलापूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली जाणार आहे.
यानंतर हे प्रकरण उस्मानाबाद पोलिसांकडे वर्ग केलं जाणार आहे. यामध्ये महिलेच्या जबाबानुसार आरोपी भगवान धनवे आणि पोलीस कर्मचारी खुणे यांच्यावर बलात्काराचा तर महिलेच्या पतीविरोधात जातपंचायत कायदा निर्मूलन कायदा आणि भा.द.वि. कलम 338 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
अशी माहिती सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे.