जनतेज न्युज

उत्कल समाजाच्या वतीने श्री जगन्नाथ महाप्रभू यांची शहरातून रथयात्रा:विविध ठिकाणी स्वागत

प्रतिनिधी, वर्धा : श्री. जगन्नाथ पुरी येथील रथयात्रा यंदा आषाढ महिन्यात मोठया उत्साहात साजरी होत आहे. आज वर्धा जिल्हयात सुध्दा उत्कल समाजाच्या वतीने श्री जगन्नाथ महाप्रभू यांची शहरातून रथयात्रा काढण्यात आली. ही रथयात्रा आज १ जुलै रोजी श्रीराम मंदिर येथून निघाली व वर्धा शहर मधे भर्मण करुण श्रीराम मंदिर येथे समापन करण्यात आले. रथयात्रा मधे विशेष आकर्षण ओडिशा प्रदेश विशिष्ट संकीर्तन व इस्कॉन संकीर्तन होते. या रथ यात्रेचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होत.