प्रतिनिधी ,सातारा : सातारा-साताऱ्याचे खा.उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्याला हात घालत आरक्षण मेरिट बघूनच देणे योग्य असल्याचे म्हणले आहे.सातारा नगरपालिकेत आलेले असताना त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे.वेळ आली तर मराठा आरक्षणावर जाहीरपणे बोलेन ,मी मराठा म्हणून स्वतःला कधी संबोधले नाही असे सांगत आरक्षणाच्या मुद्यावर रतीमहारातींना साष्टांग नमस्कार करायला तयार असल्याचे आणि आत्ता पर्यंत वडीलधाऱ्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाष्य का केले केले नाही असा सवाल देखील खा.उदयनराजे भोसले यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेता केला आहे.
