जनतेज न्युज

उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ ‘भारतीय विद्यार्थी सेना’ मैदानात

प्रतिनिधी, सोलापूर : एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांना घेऊन बंडखोरी केल्यामुळे तळागाळातील शिवसैनिक चांगलाच खवळला आहे.

सोलापुरातील ‘भारतीय विद्यार्थी सेना’ ही उद्धव ठाकरेंना समर्थन देण्यासाठी मैदानात उतरली आहे.सोलापुरातील प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थी कार्यकर्ते या घटनेने पुन्हा रिऍक्टिव्हेट झाले आहेत. सोलापुरातील महाविद्यालयांमध्ये ‘आम्ही उद्धव साहेबांसोबत’ असे फलक घेऊन विद्यार्थी घोषणाबाजी करतानाचे चित्र दिसून येत आहे.