जनतेज न्युज

उस्मानाबादेत कोरोनाच्या लसीकरणाची तयारी पूर्ण.

प्रतिनिधी , उस्मानाबाद : कोरोना लस मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. याच अनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यात लसीकरणाची तयारी करण्यात येत आहे.कोरोना लस उपलब्ध झाल्यानंतर ती लस डीप फ्रीजमध्ये ठेवण्यासह ग्रामीण भागात वितरीत करण्याची यंत्रणा सज्ज आहे.लस आल्यावर ती योग्य तापमानासह ठेवून ती लाभार्थी पर्यंत पोहोचविण्याचे सर्व टप्प्याचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. लस साठवणूक,नियंत्रण व वितरणाच्या वेगवेगळ्या टप्याचा डेमो व कार्यपद्धतीबाबत आरोग्य कर्मचारी आणि यंत्रणेला प्रशिक्षण दिले गेले आहे.लस आल्यावर अवघ्या ८ ते १० दिवसात ती प्रत्यक्ष लोकांना दिली जाण्याची तयारी पूर्ण केल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ कुलदीप मिटकरी यांनी दिली.