प्रतिनिधी, बुलडाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे वेगवेगळ्या बँकेच्या एटीएम मध्ये पैसे भरणाऱ्या सीएमएस कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी 10 ते 11 एटीएम मधुन तब्बल 15 लाखाचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी व्यवस्थापकांच्या तक्रारी वरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर एका आरोपीला अटक केली आहे.सीएमएस कंपनी मार्फत विशाल व गणेश हे दोघे वेगवेगळ्या बँकेच्या एटीएम मध्ये पैसे भरण्याचे काम करीत होते तर 31 डिसेंबर रोजी या दोघांनी संगणमत करून पंधरा लाख 36 हजार पाचशे रुपये बँकेच्या एटीएम मध्ये न भरता स्वतःकडे ठेवून अपहार केला.सी एम एस कंपनीचे शाखा व्यवस्थापक अमोल प्रकाश पांडे यांनी घटना समजताच शहर पोलिस स्टेशन तक्रार दिली तक्रारीवरून पोलिसांनी विशाल आकनकर वय 26 व गणेश गिऱ्हे या दोघांविरुद्ध भादवि कलम 409 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला यातील विशाल आकनकर याला अटक केली असुन गणेश गिऱ्हे हा फरार आहे प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग इंगळे करीत आहे.
