प्रतिनिधी , औरंगाबाद : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन बेड वाढविण्याचे जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी याअगोदरच घाटी प्रशासनाला घाटी रुग्णालयाला कळविले होते मात्र घाटीतील अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा दाखवला एकाच बेडवर दोन-तीन रुग्णांना त्यांच्यावर उपचार केले जात होते. दरम्यान ही परिस्थिती पाहता 102 बेड वाढवण्याचा निर्णय घाटी प्रशासनाने घेतला घेतला आहे तसेच कमी लक्षणे असलेल्या वर नेफरोलॉजी विभागात उपचार सुरू आहे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ट्रेसिंग टेस्टिंग ट्रीटमेंट म्हणजे शोधत तपासणी उपचार अशी त्रिसूत्री वापरण्याची सूचना पालक मंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे घाटीच्या कोरोणा वार्डात रुग्णांची संख्या वाढत असून एकाच बेडवर दोन-तीन रुग्णांना ठेवून ऑक्सिजन लावले जात असल्याची काही छायाचित्रे व्हायरल झाली होती ते कळताच यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली काहीवेळाने बेडची संख्या 528 वरून 630 केल्याचे प्रभारी अधिष्ठाता यांनी सांगितले आहे.
