प्रतिनिधी, यवतमाळ : राज्याच्या राजकारणात शिवसेनेत उभी फूट पडत असल्याने राजकारण तापले आहे.आमदार संंजय राठोड हे मुंबईहून गुवाहाटी येथे पोहोचले. कट्टर शिवसैनिक या राजकीय उलथापाथीने संतप्त झाले आहेत. कोण आमदार संजय राठोड अशी सुरुवात शिवसेना पदाधिकारी करीत आहेत. शिवसेनेने अनेकांना महत्त्वाची पदे दिली आहे. कार्यकर्त्यांच्या भरोवशावर नेते तयार झालेत. आंदोलन करीत असताना कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. जसे आम्ही आमदार, मंत्री करू शकतो, तसेच खालीही उतरवू शकतो. अशा प्रतिक्रिया यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकार्यांनी व्यक्त केल्या. आम्ही अजूनही पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांच्यासोबतच आहोत, बंडखोरांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा इशाराही देण्यात आला.
