जनतेज न्युज

कल्याण मध्ये मनसेच्या मोर्चाला पोलिसांचा नकार, पण मोर्चा काढण्यावर कार्यकर्ते ठाम

मोर्चा रोखण्यासाठी कल्याण पोलिसांचा चोख बंदोबस्त ..
प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : वाढीव वीज बिलविरोधात आज मनसेच्या वतीने कल्याण आबेडकर चौक ते कल्याण जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. मात्र, या मोर्चासाठी कल्याण पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तर पोलिसांच्या नकारानंतरही मनसे मोर्चा काढण्यावर ठाम असल्याने मनसे चा मोर्चा रोखण्यासाठी कल्याण पोलिसांनी कल्याण स्टेशन व आबेडकर चौकात चोख बंदोबस्त लावला आहे .