प्रतिनिधी, कल्याण : कल्यान जवळ शहाड येथे पावसामुळे साचलेल्या पाण्यात शाळेची बस बंद पडल्याची घटना घडली .साचलेल्या पाण्याच्या मधोमध ही बस बंद पडल्याने बस मधील मुलांना नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं .हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय .गेल्या 15 दिवसात या शहाड परिसरात पाणी भरण्याची ही चौथी वेळ आहे .या परिसरात अवघ्या तासाभराच्या पावसात अशी अवस्था होत असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी आहे .पालिकेने लवकरात तोडगा काढत या समस्येतून आमची सुटका करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
