प्रतिनिधी, यवतमाळ : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, युवा नेते राहुल गांधी यांच्या राजीनामा देण्याची चर्चा होत आहे. राजीनाम्याच्या नुसत्याच अफवा आहे,असे स्पष्टीकरण काँग्रेसचे माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांनी केले आहे. राजकारण म्हटले की, जय पराजय होत असतो. मागे झालेल्या राज्यस्थान, मध्यप्रदेश निवडणूकित भारतीय जनता पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिला नव्हता. आताही भाजपच्या गोव्यात जागा केवळ काँग्रेसमधील काही उमेदवार गेल्याने वाढल्या आहेत. जनमताचा कौल महत्वाचा असतो. तो आम्ही मान्य केला आहे. मात्र राजीनामा देन्याच्या अफवा आहे, असे स्पष्टीकरण काँगेसचे माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांनी दिले आहे.
