जनतेज न्युज

काँग्रेसच्या आंदोलनाला सुरूवात, ईडी कार्यालयाबाहेर कार्यकर्ते आक्रमक

प्रतिनिधी, मुंबई : मुंबई काँग्रेस अध्यक्ष श्री.भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखाली मुंबई, येथील  ईडी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला .या मोर्चात महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष श्री. नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक  चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड,  मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख तसेच काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते, आजी माजी आमदार, खासदार व नगरसेवक आणि पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते