जनतेज न्युज

काँग्रेसच्या महिला पदाधिका : याने घातला महिलांना गंडा,,, शिवसेनेच्या महिला आघाडीने तिची केली धुलाई,,,,

शमीम बानो असे या महिलेचे नाव,,, मुद्रा लोन मिळवून देण्याचे दाखविले होते आमिष
अनेक महिलांची केली फसवणूक

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : मुद्रा लोन मिळवून देते असे आमिष दाखवून अनेक महिलांना गंडा घालणा:या काँग्रेसची पदाधिकारी असलेल्या शमीम बानो या महिलेला शिवसेना महिला आघाडी आणि फसगत झालेल्या महिलांनी मिळून चांगला चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून शमीम बानो हिला ताब्यात घेऊन कल्याण न्यायालयात हजर केले असता कल्याण न्यायालयाने शमीम बानो हिला 28 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
कल्याणमध्ये राहणारी शमीम बानो नावाची एक महिला ही स्टॅम्प वेंडरचा काम करते. ती काँग्रेस पक्षाची पदाधिकारी सुद्धा आहे या निमित्ताने अनेक महिला तिच्या संपर्कात येतात तिने अनेकांना विविध प्रकारे गंडा घातला आहे. विशेष म्हणजे मुद्रा लोन मिळून देण्याचे आमिष दाखवून शमीमने अनेकांनी खूप पैसे उकळले आहेत. लोन मिळाले नाही. तसेच गुंतवलेले पैसे मिळाले नसल्याने फसवणूक झालेल्या महिलांनी शिवसेनेच्या महिला आघाडी पदाधिकारी आशा रसाळ यांच्याशी संपर्क साधला. आज संध्याकाळी फसगत झालेल्या महिला आणि शिवसेना महिला आघाडी कार्यकत्र्या शमीम बानोला भेटण्यासाठी पोहोचल्या. सर्व महिला तिला विचारपूस करीत होत्या. शमीम बानोने उलट सूलट उत्तरे देण्यास सुरुवात केली. यावेळी संतप्त महिला आणि शिवसेना महिला आघाडीने शमीमला चांगला चोप दिला. एवढेच नाही तर तिच्या सोबत असणाऱ्या तिच्या सहकाऱ्यांना देखील मारहाण करण्यात आले.शमीम बानो हिला पकडून महात्मा फुले पोलिसांच्या हवाली केले . महिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शमीम बानो व तिच्या कार्यालयात काम करणारे प्रमोद सिंग व ,शांती सिंह अश्या तीन जाणा विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी शमीम बानो हिला कल्याण न्यायालयात हजर केले असता कल्याण न्यायालयाने शमीम बानो हिला 28 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे . सध्या शमीम बानो दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत असून शमीम बानो हिच्याकडून अजून अनेक फसवणूक झालेल्या महिलानी संबंधित पोलीस स्थानकात तक्रार द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.