जनतेज न्युज

काटई नाका उन्नत मार्गाचा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी घेतला विस्तृत आढावा

प्रतिनिधी , शीळफाट्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीचा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याने खा डॉ शिंदे घेताहेत स्वतः
उन्नत मार्ग 1 – टनेल टप्पा 1 – टनेल टप्पा मार्ग 2 या तीनही कामांचा एम.एम.आर.डी. ए. च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी
सप्टेंबर 2021 पर्यंत पूर्ण होणार उन्नत मार्गाचा पहिला टप्पा*
नियोजित वेळेच्या आधीच ऐरोली – काटाई उन्नत मार्गाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवा – खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे विभागाला निर्देश
ऐरोली – काटई नाका उन्नत मार्गाचा आणि टनेल टप्पा क्रमांक 1 च्या कामाचा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी आज एम.एम.आर.डी.ए. च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत पाहणी करत विस्तृत आढावा घेतला. यातील टप्पा क्रमांक चे काम सप्टेंबर 2021 पर्यंत पूर्ण होणार असून , टनेल टप्पा क्रमांक 1 चे काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे. टप्पा क्रमांक 2 च्या कामासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू असून लवकरच या कामाला देखील सुरवात होणार असल्याची माहिती डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिली.
या पाहणी दौऱ्यात डॉ शिंदे यांनी उन्नत मार्ग 1 – टनेल टप्पा 1 – टनेल टप्पा मार्ग 2 या तीनही कामांची पाहणी करत नियोजित वेळेच्या आधीच ऐरोली – काटाई उन्नत मार्गाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवा असे निर्देश खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित एम.एम.आर.डी.ए. च्या अधिकाऱ्यांना दिले.
या प्रकल्पाची वैशिष्ट्य खालीलप्रमाणे.
1) ऐरोली काटाई नाका रस्ता प्रकल्प हा ऐरोली पुलापासून सुरू होऊन ठाणे – बेलापूर रस्ता , ठाणे – बेलापूर रेल्वे , राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 , दिवा – पनवेल रेल्वे, इ. ओलांडून कल्याण – शीळ रस्त्यावरील