जनतेज न्युज

कायम कार्यकर्त्यांना गाजर दाखवावं लागतं – अजित पवार

प्रतिनिधी , कराड: कायम कार्यकर्त्यांना गाजर दाखवावं लागतं – अजित पवार
विरोधकांना नेहमी कार्यकर्ते सोबत राहण्यासाठी सरकार पडणार पडणार असं म्हणावंच लागतं
कायम कार्यकर्त्यांना गाजर दाखवावं लागतं
शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी यांनी ही महाविकास आघाडी निर्माण केली आहे, यांचे आशीर्वाद आहे तोपर्यंत सरकार मजबूत आहे
चंद्रकांतदादा पाटील यांना कुणी सांगितलं आम्हाला मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडली…आम्ही स्वप्नं पडण्याचं काम करत नाही, आम्ही कृती करणारी माणसं
अजून नऊ महिने झालं तरी कोरोनावरची लस आली नाही
105 आमदार असताना सरकार बनवता आलं नाही हे त्याचं खरं दुखणं आहे, म्हणून सारख्या काट्या पेटवतात
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार काम करत आहे
प्रवेशाबाबत लवकरच जी आर काढला जाणार आहे, दोन दिवसात निर्णय घेऊ
ईडीच्या कारवाई दरम्यान केंद्र सरकार कशा पद्धतीने, कुठल्या फोर्सची मदत घेतात त्यांचा निर्णय असतो
पवार साहेब यांनी या कारवाई बाबत मत व्यक्त केलं आहे…
वीज बिलाच्या संदर्भात अभ्यास सुरू आहे
59 हजार कोटी रुपयांचे वीज बिल थकीत आहे
गेल्या सरकारमुळे महावितरण अडचणीत आले आहे
कोरोनात राज्याची आर्थिक स्थिती बिकट बनली
29 हजार कोटी रुपये केंद्रकडून येणं बाकी आहे,
मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवून देखील नैसर्गिक संकटात केंद्र राज्याच्या पाठीशी उभा राहील नाही
केंद्राने सर्व राज्यांना देश म्हणून समान वागणूक दिली पाहिजे, ती सध्या दिसत नाही
आपल्या पक्षाचे सरकार नाही म्हणून निधी देताना भेदभाव होतो
मदत पुनर्वसनला 2 हजार कोटींचा पुढचा हप्ता देणार..