जनतेज न्युज

काल्हेर गोळीबार प्रकरणी तीन जनाना अटक

प्रतिनिधी , भिवंडी : भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना 3 जानेवारी रोजी घडली होती. या घटने प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. विकी उर्फ सोनु प्रकाश म्हात्रे, प्रथम किशोर भोईरआणि वैभव विजय भोकरे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या राजकीय वर्चस्वाच्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांनी दिली. 2 जानेवारी रोजी म्हात्रे हे पत्नीसह घरासमोरील परिसरात आपल्या भावाने घेतली गाडी बघत होते. तेव्हाच अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. मात्र, म्हात्रे यांनी प्रसंगावधान राखत गोळी चुकवली आणि पत्नीलाही सुरक्षित ठिकाणी नेले. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडणूक करून आदर्श गाव सिद्ध करण्याचा मनसुबा दीपक म्हात्रे आणि त्यांची पत्नी यांनी उमेदवारी अर्ज भरून बिनविरोध निवडीला खो घातलाया याचाच राग मनात ठेवून ही घटना घडवूंन आणली … घटने प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आल्यानंतर पोलीस व गुन्हे शाखेचे पथक या घटनेचा समांतर तपास करीत होते. गुन्हे शाखा भिवंडी युनिटच्या पथकाने गुप्त बातमीदारामार्फत या घटनेतील आरोपींबाबत माहिती मिळवली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी तिघांना ताब्यात घेतले. त्यांचे कडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. अटकेतल्या आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ग्रामपंचायत न8वडणुकीत आपल्याच पक्षाचे वर्चस्व राहावे या कारणातून विकी उर्फ सोनु प्रकाश म्हात्रे आणि त्याचे साथीदार यांनी दीपक म्हात्रे यांच्यावर गोळीबार केल्याचे पोलीस तपासातून समोर आल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांनी दिली.