जनतेज न्युज

कित्येक वर्षांपासून रोड चे काम पूर्ण न झाल्या मूळे खानोली ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण

प्रतिनिधी, रत्नागिरी :  या पंचक्रोशीतील गेले कित्येक वर्ष सामान्य गोर-गरीब जनतेचे प्रश्न हाताळले गेले नाहीत.सापुचेतळे ते खानोली फाटा या रोडला किमान पाच गावे जोडली जातात. त्यामुळे या पचाही गावांना त्याच्या फटका बसतोय त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होतात. या रोड संदर्भातले पत्र व्यवहार संमधीत खात्याकडे करून त्याचा काहीही उपयोग झाला नाही. यामध्ये आतापर्यंत जिल्हा परिषद, पंचायत समिती,यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार केलेले आहेत 2019 पासून हा रोड व्हावा म्हणून आमची मागणी चालू आहे.तसेच महसूल खात्याचे मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना पत्र पाठवले हॊते परंतु  या पत्राची कुठल्याही पद्धतीने दखल घेतली गेली नाही. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील आम्ही या संदर्भात पत्र पाठवले होते. त्याची देखील दाखल घेतली गेली नाही.असे येथील ग्रामस्थांनी सांगितले जो पर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत येथील ग्रामस्थ उपोषण चालू ठेवणार आहेत.