प्रतिनिधी , जालना : सिरम किंवा भारत बायोटेकच्या फेज थ्रीच्या क्लिनिकल ट्रायलला केंद्र सरकार आणि ड्रग अँथॉरीटी ऑफ इंडियाने मान्यता दिल्यास कोरोना लसीकरण सुरु करता येऊ शकेल असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.केंद्र सरकारने राज्याला दिलेल्या वेळापत्रकानुसार महाविकास आघाडी सरकार आणि आरोग्य काम करत असून बूथ निहाय लसीकरणासाठी आरोग्य विभाग तयार असून राज्यात लसीकरणाची तयारी पूर्ण झाली असल्याचं देखील आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
