जनतेज न्युज

केडीएमसीच्या उबर्डे प्रकल्पावरील ताण वाढला; कचरा गाड्याच्या रांगा , दुर्गंधीने रहिवासी त्रस्त

प्रतिनिधी, कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारलेल्या उबर्डे येथील कचरा प्रकल्पात ओल्या कचर्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर मिक्स कचरा धाडला जात असल्याने या प्रकल्पाकडे येणाऱ्या गाड्याची संख्या जवळपास दुपटीने वाढली आहे यामुळे प्रकल्पावर ताण पडला असून प्रकल्पाबाहेर कचरा गाड्याच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने स्थानिक रहिवासी त्रस्त आहेत. मात्र प्रकल्पाच्या रस्त्यावर आरसी घंटागाडी रुतल्याने गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे कारण पालिकेच्या प्रकल्प अधिकाऱ्याकडून देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

पालिकेच्या उबर्डे कचरा प्रक्रिया केंद्राबाहेर जवळपास 30 पेक्षा जास्त कचऱ्याच्याया गाड्याची रांग लागली होती. सकाळपासून प्रकल्पावर कचरा घेऊन गेलेल्या गाड्या रांगेत अडकून पडल्याने चालक त्रासले होते. पहाटेपासून दुपारी 3 वाजेपर्यंत सुटका होत नसल्याने चालकांनी त्रागा व्यक्त केला. दरम्यान दिवसभर लागलेल्या घंटागाड्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताच प्रशासन खडबडून जागे झाले. दरम्यान प्रकल्पात कचरा टाकण्यासाठी गेलेली घंटागाडी अडकून पडल्याने रस्ता बंद झाला होता. ही गाडी बाहेर काढण्यासाठी काही तासांचा कालावधी लागल्याने घंटागाड्याची रांग लागल्याचे स्पष्टीकरण पालिकेच्या उपायुक्त अतुल पाटील यांच्याकडून देण्यात आले. दुपारपर्यंत गाड्या रिकाम्या होत नसल्याने काही कचरा भरलेल्या गाड्या माघारी नेण्यात आल्या.