प्रतिनिधी , पुणे : पुणे शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आज पालकमंञी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला खासदार,आमदार ,पोलिस आयुक्त, अधिकारी उपस्थित होते. शहरात आवश्यक ठिकाणी मायक्रो कंटेन्मेन्ट झोन तयार करणे, चाचण्या वाढवणे आणि शहर आणि तालुका स्तरावरील कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
तसेच राज्यातून रेल्वे, एसटी, खाजगी ट्रँव्हल्समधून येणाऱ्या वाहनांवर कोणतीही बंधने लादण्यात आली नाही. लग्न समारंभात फक्त दोनशे लोकांना परवानगी असून इतर सार्वजनिक कार्यक्रमात जर नियमांचे उल्लघन झाल्यास कारवाई करण्याचा इशारा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिला आहे. तसेच खाजगी क्लासेस, महाविद्यालये, शाळा २८ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असून पुढील निर्णय परिस्थिती बघून घेतला जाईल. राञी अकरा ते पहाटे सहा पर्यत नियंञित संचार असून आवश्यक वाहने वगळता या दरम्यान इतर नागरिकांनी संचार केला तर कारवाई केली जाणार आहे असं विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले आहे.
