जनतेज न्युज

‘कोरोना काळात भ्रष्टाचार; ‘हीच ती वेळ’ मनसेची शिवसेनेवर बोचरी टीका

प्रतिनिधी, मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी २६ जून रोजी पत्रकार परिषद घेत कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात आलेल्या मृतदेह बॅगमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. याशिवाय कोरोना संकट काळात महापालिकेने खरेदी केलेले पीपीई किट, मास्क यामध्येदेखील घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता देशपांडे यांनी सोशल मीडियावरुन शिवसेनेवर निशाणा साधतपुन्हा भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. देशपांडे यांनी ‘शेम ऑन शिवसेना’ असा हॅशटॅगचा वापर करत सोशल मीडियावर काही पोस्ट केल्या आहेत.

शिवसेनेची हीच ती वेळ अशी टॅग लाईन वापरत देशपांडेनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. कोरोना काळात भ्रष्टाचार करण्याची हीच ती वेळ, अशी पोस्ट करत संदिप देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मृतांचा आकड़ा लपवून जनतेची फसवणूक करण्याची हीच ती वेळ, असंही एका पोस्टमध्ये म्हटले आहे.