प्रतिनिधी , पुणे : कोरोना व टाळेबंदीने हातावर पोट असलेल्या रिक्षाचालकांची परिस्थिती हलाखीची झाली आहे.सरकारला जाग करण्यासाठी आज काँग्रेस कार्यालया बाहेर मौन आंदोलन करण्यात आलं रिक्षाचालकांना विविध प्रकारे सहाय्य मिळावे म्हणून रिक्षा पंचायत लॉकडाउन सुरू झाल्यापासून प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने बैठक घेवून आपले प्रश्न मार्गी लावावे बहुतेक स्थानिक पातळीवरील निर्णयही मार्गदर्शनासाठी राज्य शासनाकडे पाठवण्याचे बैठकीत ठरवण्यात आले. तसेच रिक्शाचालक कल्याणकारी मंडळ, वाहन कर्ज कोरोना काळ कर्जमुक्ती हे विषयही राज्य शासनाशी संबंधित आहेत. त्यासाठी राज्य शासन चालवणार्या सत्ताधारी पक्षांकडेच आता न्यायासाठी दाद मागण्याचा निर्णय रिक्शा पंचायतीने घेतला आहे. म. गांधी विचार मौन सत्याग्रह ’ करण्यात आलं
