जनतेज न्युज

कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालय.

प्रतिनिधी , नागपूर : कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालय. यात इंग्लंडमध्ये नव्या कोरोना व्हायरसचा स्ट्रेन प्रादुर्भाव वाढत आहे. ब्रिटनमध्ये नवा कोरोना विषाणू सापडल्याने जगासमोर आव्हान उभे राहिले आहे. नवा विषाणू किती प्रभावी आहे यावर संशोधन सुरू असताना नागपूरमध्ये इंग्लंडहून आलेल्या तरूणाला कोरोनाची लागण असल्याचा संशय आहे.इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या २८ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. त्याचा संपर्कात आलेल्या 7 जणांना लागण झाली. त्याची प्रकृती ठीक असून त्याच्यावर सध्या मेडिकलमध्ये वेगळा वार्डात ठेवण्यात आलेय.