प्रतिनिधी ,सांगली; सांगलीच्या मिरज तालुक्यातील खटाव येथील परीट वस्तीमध्ये जिल्हा परिषद शाळेसमोर असणाऱ्या डी. पी. ट्रॉन्सफॉर्मर वर दुरूस्ती करणाऱ्यासाठी चढलेल्या वायरमन श्रीशैल महादेव शिंगाडे मुख्य विद्युत तारेला शॉक लागून खांबावरच मृत्यू झाला आहे.
खटाव येथे परीट वस्तीमध्ये वीज नसल्याचे तक्रार असल्याचे समजल्यामुळे श्रीशैला वायरमन दुरुस्ती करण्यासाठी ठीक साडेचारच्या सुमारास ट्रॉन्सफॉर्मवर दुरूस्ती करण्यासाठी चढले होते. लिंगनूर येथील विद्युत उपकेंद्रमध्ये मुख्य वीज पुरवठा बंद केले नसल्यामूळे शॉक लागून खांबांवरच जागीच ठार झाले.संपूर्ण गावात श्रीशैलला शॉक लागल्याचे शेजाराच्या लोकांना समजातच आरडा ओरडा केला.विद्युत वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे एका तरुण वायरमनचा दुर्दैर्वी मृत्यू झाला.
मृत्यूचा गुन्हा मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद केल्यामुळे घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी मुलाणी व विद्युत वितरण कंपनीच्या मिरजच्या दिक्षित नावाच्या अधिकाऱ्याकडून पंचनामा करण्याचे काम उशिरापर्यत सुरू होते.
