जनतेज न्युज

खडकवासल्यातील कचरासमस्येबाबत मनसेचे आंदोलन

प्रतिनिधी , खडकवासला : किरकटवाडी खडकवासला गावचा पुणे महानगरपालिका हद्दीत समावेश झाल्यापासून तब्बल पाच ते सहा दिवसांतून एकदा कचरागाडी येत असल्याने कचऱ्याची समस्या बिकट बनली आहे.पालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही कार्यवाही होत नसल्याने मनसेच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालिकेचा निषेध म्हणून रस्त्यावर कचरा फेको आंदोलन केले.
खडकवासला गावातील महात्मा गांधी चौकात हे आंदोलन करण्यात आले. कचरा गोळा करण्यासाठी नियमीत गाडी यायला हवी, वर्षानुवर्षे साठलेले कचऱ्याचे ढीग तात्काळ उचलण्यात यावेत,ओला व सुका कचरा वेगळा करण्याची व्यवस्था करण्यात यावी, परिसरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारण्यात यावा अशा मागण्या आंदोलकांनी केल्या.