प्रतिनिधी, भंडारा : जिल्ह्यात सध्या पेरणीची लगबग सुरू असुन मोठया प्रमाणात शेतकरी वर्गाने बि-बियाने व खतांच्या खदेदीसाठी कृषी केनद्राकडे धाव घेतल्याचे दिसुन येत आहे.मात्र याच संधीचा फायदा घेत खत विक्री करणा-या कंपन्यांकडुन कृषी केंद्रामार्फत शेतक-यांना अनावश्यक वस्तुंची खरेदीची सक्ति केली जात असल्याचे दिसुन येत आहे.खत खरेदी करतांना सोबत लिंक केलेली अनावश्यक औषधांची सुध्दा खरेदी करण्याची बळजबरी शेतक-यांना केली जात आहे.त्यामुळे शेतक-यांना अधिकचा आर्थिक भुर्दंड बसत आहे.
