प्रतिनिधी, वरदा : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे या आज बुधवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी सेवाग्राम आश्रमाला भेट दिली त्यानंतर शासकीय विश्रामगृहामध्ये दुपारी पत्रकार परिषद झाली पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. नितेश राणे यांच्या ट्विट बद्दल विचारल्यास माझा संविधानावर पुर्ण विश्वास आहे. त्याच्यामुळे कोणी जर टिका केली तर त्यावर गैर काय आहे. तो सगळ्यांचा अधिकार आहे. का त्यांनी करु नये टिका.भाजपच्या विरोधातले जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या नेत्यांवरच हा प्रहार ईडीचा कसा होतो हा माझा प्रांजळपणे प्रश्न केंद्राला आहे.
