जनतेज न्युज

गळा चिरून महिलेला ठार मारण्याचा प्रयत्न ; धामणगाव मार्गावरील धक्कादायक घटना

प्रतिनिधी, यवतमाळ : शहरातील धामणगाव बायपास मार्गावर एका महिलेला मारहाण करून तिचा  गळा चिरून जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उडघकिस आली. अनैतिक संबंधामधून हा हल्ला झाल्याची माहिती असून पोलिसांनी मारेकरी प्रियकरास  अटक केली आहे. यवतमाळ शहरातील धामणगाव बायपास धारीवाल रेसिडेन्सीच्या मागील बाजूच्या वीट भट्टीजवळ एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याची माहिती यवतमाळ शहर पोलिसांना मिळाली.लागलीच शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. शाहरुख खान बहादूर खान (रा. नेताजी नगर) याचा शोध घेऊन अटक करण्यात आली.