प्रतिनिधी, गोंदियात : दिवाळी नंतर गोंदिया जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दररोजच मृतांची संख्याही झपाट्याने वाढत असल्याचे बघावयास मिळत आहे. आजघडीला कोरोना बाधितांची संख्या १2 हजारचा आकडा पार करून पुढे गेला असुन ही बाब गंभीर आहे. कोरोनाने गंभीर असलेल्या रूग्णांवर प्लाझ्मा थेरपी जीवनदायी ठरत असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे प्लाझ्माची मागणी वाढत चालली आहे. मात्र गोंदिया जिल्ह्याची शोकांतिका अशी की, जिल्ह्यात प्लाझ्मा युनिट येऊन ४ महिने लोटले तरी प्लाझ्मा युनिट सुरु झालेली नाही. मात्र आता दिवाळी नंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाटत असल्याने आता प्लाझ्मा मशिनी सुरु करण्यासाठी ज्या काही त्रुट्या व टेक्निशियन पद नव्हते ते आता भरण्यात आले व या आढवाड्यात प्लाझ्मा सुरु करण्यात येण्याचे आहे.
गोंदिया मेडिकल महाविद्यालय अंतर्गत येत असलेल्या बाई गंगाबाई शासकीय रक्तपेढीला प्लाझ्मा थेरपीसाठी लागणारी परवानगी मिळाली आहे. तसेच रक्तपेढीत प्लाझ्मा थेरपीसाठी लागणारी मशिनही आली असुन एक विशेष युनिट तयार करण्यात आले आहे. युनिटसाठी लागणारी सर्वच तयारी रक्तपेढी विभागाकडुन करण्यात आली असुन डोनर्ससाठी तयारी सुरू आहे. अशात या आठवड्यात प्लाझ्मा युनिट सुरू होणार आहे.
