जनतेज न्युज

घरकुलाचे काम उत्कृष्ट केल्याबद्दल आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांचा पुरस्कार वितरण सोहळा.

प्रतिनिधी , हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव पंचायत समितीमध्ये महाआवास योजना अभियान ग्रामीण अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण राज्य पुरस्कृत प्रवास योजने अंतर्गत विविध उपक्रमाच्या माध्यमातून उत्कृष्ट घरकुल बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांना व ग्रामपंचायतींना तालुकास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आज आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते संपन्न झाला

या कार्यक्रमास हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे,पंचायत समिती सभापती संतोष खोडके,गट विकास अधिकारी एस आर बेले,उपसभापती सौ अरुणा रवींद्र गडदे,जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती सदस्य,सरपंच,ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते.

तसेच यावेळी तालुकास्तरीय उत्कृष्ट ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात आले व तालुकास्तरीय उत्कृष्ट घरकुल पुरस्कार प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत देण्यात आले त्यापाठोपाठ राज्य पुरस्कृत आवास योजना या कार्यक्रमात उपरोक्त प्रमाणे पुरस्कार आमदारांच्या हस्ते व पंचायत समितीच्या पदाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.