जनतेज न्युज

चंद्रकांत दादा पाटील सारखा मी भविष्यकार नसून भाजीवाला आहे – छगन भुजबळ

प्रतिनिधी, नाशिक : पालकमंत्री छगन भुजबळ आज येवला येथे विविध विकास कामाच्या दौरा प्रसंगी आले होते.यावेळी पत्रकारांनी विचारले की … पाच राज्यात निवडणुका सुरू असून भाजपला यश मिळेल का…याबद्दल भुजबळ यांना विचारले असता भुजबळ म्हणाले की…. मी चंद्रकांत दादा पाटील सारखा भविष्यकार नसून भाजीवाला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या जागा पहाण्यासाठी किरीट सोमय्या हे करलेई गावात दाखल झाले याबद्दल विचारले असता भुजबळ म्हणाले….. त्या गावातील माध्यमांमधून दाखवत आहे मात्र तेथे तर पडके घरे दिसत आहे….

भुजबळ फार्महाऊसवर पाहणी केल्या प्रकरणी किरीट सोमय्या यांना नोटीस देण्यात आलेली आहे असे समजते….या बद्दल भुजबळांना विचारले असता भुजबळ म्हणाले की… सांताक्रूझ येथील बंगला असून या ठिकाणी किरीट सोमय्या काही लोकांना घेऊन गेले होते मात्र पोलिसांनी गर्दीमुळे त्यांची तब्येत बिघडू नये याकरता पोलिसांनी नोटीस बजावली होती….